Latest Marathi News
Ganesh J GIF

“हडपसर आमदारांच्या घरवापसी प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे “नो कॉमेंट्स”

हडपसर (प्रतिनिधी) – हडपसर गणेशोत्सवास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेट देण्यास आले होते, राज्यात अनेक आमदारांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश होत असताना हडपसरच्या विद्यमान आमदारांची घरवापसी होणार का? या प्रश्नावर जयंत पाटील यांनी आमच्यात काही चर्चा नाही, तुमच्याकडे माहिती असेल तर सांगा असे सांगून या प्रश्नाला बगल दिली. हडपसर मतदारसंघातून महाविकास आघाडीतून प्रशांत जगताप यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.

हडपसर येथील कामधेनू मित्र मंडळाच्या आरती साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले होते, यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, निलेश मगर, प्रविण तुपे उपस्थित होते. यावेळी अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांची येथे दाखल झाले त्यावेळी आमदार म्हणाले तुम्ही येणार मला माहित नव्हते त्यावर तुम्ही येथील आमदार आहात तुम्हाला माहिती पाहिजे असे जयंत पाटील बोलले, सत्कार समारंभ पार पडल्यावर जयंत पाटील महिला अध्यक्ष वंदना मोडक यांच्या शॉपमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी गेले होते, त्यांच्याशी प्रसिद्धीमाध्यमांनी संवाद साधला

राज्यात अनेक आमदारांचे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश होत आहेत, हडपसरच्या आमदारांची घरवापसी होणार का? असा सवाल केला त्यावेळी पुन्हा आमदार चेतन तुपे हजर झाले अन जयंत पाटील यांनी तेच आले त्यांना विचारा आमच्यात काहीही चर्चा नाही, तुमच्याकडे काही माहिती असेल तर आम्हाला सांगा असे सांगून या प्रश्नावर थोडक्यात “नो कॉमेंट्स” चा शेरा मारला. समवेत यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप होते, महाविकास आघाडी मधून हडपसर विधानसभेसाठी ते इच्छुक आहेत, जगताप शरद पवारांचे निष्ठावंत शिलेदार असल्याने त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे, त्यामुळे हडपसरच्या विद्यमान आमदारांनी प्रयत्न करूनही त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी होणार नसल्याची चिन्हे आहेत.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!