Latest Marathi News
Ganesh J GIF

रावसाहेब दानवे यांचा तुफान हल्ला ; महाविकास आघाडीच्या तीन तऱ्हा; मुख्यमंत्री पदावर सर्वांचाच डोळा

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे भाजपने मुंबईत मंथन केले. तर आगामी विधानसभेसाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधानसभेसाठी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे.त्याचवेळी भाजपच्या गोटातून महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत महाविकास आघाडीवर तोंडसूख घेतले.संजय राऊत सकाळी सांगतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार, तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील त्यांना शांत करतात. त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करतात. आणि यानंतर गळ्यात रुमाल बांधून भावी मुख्यमंत्री नाना पटोले काही तरी बोलतात, असा चिमटा रावसाहेब दानवे यांनी काढला. महाविकास आघाडी मध्ये काही अलबेल नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

सांगलीच्या जागेवरून किती वाद झाले हे माहित आहे सगळ्यांना. सांगलीत काँग्रेसने बंडखोरी केली. जनतेने कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली. शेतकरी, युवक असे विकास कामांचा अर्थसंकल्प राज्य सरकारने सादर केला. या सगळ्या जनहिताच्या योजना आहेतय सभागृहात यावर टीका करायची आणि आपल्या मतदारसंघात होर्डिंग लावायचं, अशी दुटप्पी भूमिका हे नेते घेत आहेत, असल्याचे ते म्हणाले.गेले दोन दिवस भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. भूपेंद्र यादव, आणि अन्य नेते बैठकीला उपस्थित होते. मराठवाडा, विदर्भ गोव्यासह मुंबई जागांची चर्चा केली. एकूण राजकीय परिस्थिती, मित्र पक्ष आणि निवडणूक मित्रांसोबत लढण्याची चर्चा झाली. आमच्या मित्र पक्षांसह 288 जागा आम्ही लढावणार आहोत. आमचे नेते आणि घटकपक्ष एकत्र बसून फॉर्म्युला ठरवणार आहोत.भाजप महाराष्ट्रचा विचार करणारा पक्ष आहे. 288 मतदारसंघचा आम्ही अभ्यास केला, अशी माहिती त्यांनी दिली.

आमचं सरकार पुन्हा सत्तेत आणायचं आहे. पुण्यात उद्या आमचं अधिवेशन होणार आहे. अमित शाह याला मार्गदर्शन करणार आहेत. 5 हजार कार्यकर्ते याला उपस्थित राहणार आहेत. सरकारच्या योजना किती महत्वाच्या आहेत हे उद्या सांगु. लोकांना मी सांगेन, सरकारने दलाला न ठेवता फॉर्म भरू शकता लोकांकडून पैसे घेण्याचं काम मविआवाले करतील, असा आरोप त्यांनी केला. आघाडी, युती किंवा या आधी जे काही झालं त्या फॉर्म्युला नुसार नेते एकत्र बसतील. विधानसभेच्या किती जागा लढायच्या आणि कुठंली लढायची यावर चर्चा नाही केली. पण एकत्र बसून निर्णय घेऊ, अशी माहिती त्यांनी दिली.गेले वर्षभर जरांगे पाटील या मागण्या घेऊन फिरत आहेत.लोकसभेत याचा परिणाम आपल्याला दिसला. आघाडी नेत्यांना वाटेल याचा फायदा आपल्याला होईल. त्यांनी उपोषणाला बसावं पण, जे आपले मतदारसंघात प्रचार करत आहेत त्यांची एक बैठक बोलवा. आमच्या नेत्यांशी चर्चा करावी आणि विचारावं, एक निर्णय द्या ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी पूर्ण करणार का? याचं उत्तर निवडून आलेले देणार नाही. त्यांचं उपोषण जरूर करावं आमचा विरोध नाही. सरकार चर्चेला तयार आहे. पण जे निवडून आले त्यांना पण सामोर उभं करा, पण जर ते बोलू शकत नसतील तर मविआ फक्त सत्तेसाठी सगळं करतं आहेत. कल्याण काळे बोलणार आहेत का तर नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!