Latest Marathi News
Ganesh J GIF

डाॅ. कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची तीव्र निदर्शने

निपक्षपाती तपास करत कारवाईची मागणी, घोषणाबाजीने बालगंधर्व चोैक दणाणला

पुणे दि ८(प्रतिनिधी)- देशाची गुपिते पाकीस्तानला देणाऱ्या संघस्वयंसेवक डॉ. प्रदीप कुरुलकर या DRDO चा प्रमुख शास्त्रज्ञास कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यासाठी आज निदर्शने करण्यात आली आहेत.

डॉ कुरुलकर ISI साठी हेरगिरी करताना पोलिसांनी पुण्यात पकडला ,याने आजपर्यंत ISI ला काय गोपनीय माहिती पुरवली आणि देशाचं किती नुकसान केलंय, याचीही चौकशी व्हावी या मागणीकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने बालगंधर्व चौकात निदर्शने करण्यात आली. डॉ कुरूलकर हा माझ्या चार पिढ्या संघाचे काम करीत आहेत व माझ्यावर संघाचे संस्कार आहे मी आर एस एस चा शाखा प्रमुख असून त्याकरीता कार्य करत असल्याचे अभिमानाने सांगतानाच्या व्हीडीओ क्लिप प्रसार माध्यमांमघ्ये पहायला मिळत आहेत , ज्या संघटनेच्या स्वयंसेवकाला देशद्रोहाच्या गुन्ह्यत अटक होते त्या संघटनेने अजूनही त्या व्यक्तीचे निलंबन केलेले नाही यावरूनच या संघटनेचे देशप्रेम लोकांना समजून येत
आहे , जर सदरील व्यक्ती ही इतर कोणत्याही समाजातील असती तर याच मंडळीनी संपूर्ण भारत आज नंगानाच केला असता संबंधित यंत्रणांनी कोणत्याही दबावास बळी न पडता सदर व्यक्तीची कठोर चौकशी करून त्याच्याबाबत सर्व पुरावे गोळा करून त्यास जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे.

 

आंदोलनावेळी घोषणाबाजी करत परिसर दणाणून गेला होता.यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख , विनोद पवार , बाबा पटील , सुवर्णा माने , प्रदीप हुमे , वंदना साळवी , सुनिल पडवळ , विशाल गद्रे , राहूल तांबे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!