हा तर पुणे महापालिका आणि भाजपाने घातलेला गोंधळ
आप नेते विजय कुंभार यांचा आरोप, पुणे महापालिकेला इशारा, कराचा पैसा परत देण्याची मागणी
पुणे दि ९(प्रतिनिधी)- पुणे महानगरपालिका प्रशासनाने मिळकत करातील ४०% सवलतीसाठी नागरिकांकडे वाढीव कोणतीही माहिती मागू नये. ज्या माहितीच्या आधारे वाढीव मिळकत कराचा पैसा घेतला, त्याच माहितीच्या आधारे वाढीव घेतलेल्या कराचा पैसा परत करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कराच घोंगडं अजून भिजतच पडलेल आहे. स्वतः मिळकतीचा वापर करणाऱ्यांना मिळकत करात देण्यात येणारी ४०% सवलत आधी काढून घेण्यात आली आणि नागरिकांच्या प्रखर विरोधानंतर परत बहाल करण्यात आली. मात्र अजूनही ही सवलत कशा पद्धतीने द्यायची याच्या संदर्भात नेमकं कुणालाच काहीही कळत नाहीये. आता पुणे महापालिकेने यासाठी एक फॉर्म जारी केलेला आहे आणि त्याच्याबरोबर ढीगभर कागदपत्रांची मागणी तसेच २५ रुपये फीची सुद्धा मागणी केलेली आहे. मुळात यात नागरिकांचा काहीही दोष नाही. भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन या दोघांनी मिळून केलेला घातलेला हा गोंधळ आहे. आता या गोंधळामुळे नागरिकांची फरपट फरफट होत आहे. जर जास्तीचे घेतलेले पैसे परत द्यायचेच आहेत तर त्यासाठी एवढं आकांड तांडव कशासाठी? पुणे महापालिकेकडे सर्व मिळकतदारांची संपूर्ण माहिती आहे आणि तीही ऑनलाईन. असं असताना नागरिकांकडे वाढीव माहिती मागण्याची काय गरज आहे? थोडक्यात सांगायचं तर ज्या पद्धतीने हा कारभार चालला आहे ते पाहता प्रशासनाला नागरिकांना पैसे परत द्यायचे आहेत की काहीतरी नाटक करून नागरिकांची अडवणूक करायची आहे? अशी शंका घ्यायला जागा आहे. असे कुंभार म्हणाले आहेत.
ज्यांनी पुणेकरांची ४०% सवलत काढून घेतली तेच नंतर ती सवलत पुन्हा बहाल केल्याचे टिमकी मिरवत होते. मात्र ज्या पद्धतीने पुणे महापालिका नागरिकांची अडवणूक करू पहात आहे ते पाहता नागरिकांना सवलत देण्याचे संगनमताने केलेलं नाटक आहे का? असा आरोप आपने केला आहे.