लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातच विवाहितेची आत्महत्या
माहेरच्या मंडळींचे सासरच्यांवर गंभीर आरोप, हत्येचा आरोप करत कारवाईची मागणी
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील शिरगाव येथील विवाहित तरुणीचा नवी मुंबईत संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पण तिचा मृत्यू झाला नसून पतीसह सासरच्या मंडळीनी तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींकडून करण्यात आला आहे.
निलम वैभव जाधव असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाई तालुक्यातील शिरगाव येथील निलम हिचा विवाह खानापूरच्या वैभव जाधव याच्याशी दोन वर्षापूर्वी झाला होता. पण वैभव कामानिमित्त मुलुंड येथे राहत होता. लग्नानंतर काही दिवसातच निलमला सासरच्या मंडळीकडून त्रास दिला जात होता. कमाल म्हणजे तिला माहेरच्या लोकांशी बोलू दिले जात नव्हते. तसेच नीलम आणि वैभव यांच्यात आठवड्यापूर्वी भांडण झाले होते. त्यामुळे ते गावी आले होते. गावात काही दिवस राहिल्यानंतर ते पुन्हा मुलुंडला गेले. पण त्यात रात्री वैभवने निलमच्या माहेरच्यांना फिन करत निलमने आत्महत्या केल्याचे सांगितले. कोपरखैरणे पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनी पंचनामा करून गुन्हा नोंद केला त्यानंतर नमिशनच्या मृतदेहावर तिच्या माहेरी शिरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसातच निलमने जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
माहेरच्या मंडळींनी मात्र जाधव कुटुंबावर आरोप केले आहेत. निलमचा मृत्यू झाला नसून निलमची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. नीलम आत्महत्या करू शकणार नाही. तिला पती वैभव, सासरा शांताराम, सासू सुवर्णा आणि नणंद वर्षा हे सतत मारहाण करत त्रास देत होते. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी निलमच्या माहेरच्या मंडळींनी केली आहे.