
भाजप समर्थन आमदाराच्या घरी लाखोची चोरी करत धमकी
जवळच्या व्यक्तीनेच केली चोरी खंडणीची मागणी करत बदनामीची धमकी, पोलीसांकडुन तपास सुरु
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- राज्यात गुन्हेगारी आणि चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आता तर गुन्हेगारांची हिंमत इतकी वाढली आहे की, आता तर नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबईतील राहत्या घरात लाखोंची चोरी झाली आहे. इतकेच नाही तर आरोपींनी त्यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.
श्यामसुंदर शिंदे यांचे मुंबईतील लोढा बॅलोसिमो को-ऑप हौसिंग सोसायटीमध्ये घर आहे. त्यांचा चालक चक्रधर पंडित मोरे याने मित्र अभिजीत कदमसह चोरी केली. १ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान दोघांनी २५ लाखांची चोरी केली. ऐवढ्यावरच न थांबता आरोपींनी आमदार श्यामसुंदर यांना फोन करून ३० लाखांची खंडणी देखील मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच पैसे न दिल्यास रायगडवर जाऊन बरेवाईट करून घेण्याची धमकी देत, सोशल मीडियावर देखील बदनामी करण्याची देखील धमकी दिली आहे. श्यामसुंदर शिंदे यांच्या पीएने एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये चालक चक्रधर पंडित मोरे आणि त्याचा मित्र अभिजीत कदम यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. आरोपी चालक आणि त्याच्या मित्राचा शोध घेतला जात आहे. चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शिंदे भाजपा समर्थक आमदार आहेत.आता तर थेट त्यांना समर्थन देणाऱ्या आमदारालाच धमकी दिल्याने गृहमंत्री म्हणून फडणवीसांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
श्यामसुंदर शिंदे हे शेकापचे लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार आहेत. सुरुवातीला त्यांनी भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले. नंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. आता त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे.