पुणे दि १८ (प्रतिनिधी)- पुण्यात लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धायरी परिसरात ही घटना घडली आहे. कटरने गळा चिरून घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. महेश राजाराम तवंडे असे त्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण या घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हा एका खाजगी कंपनीत ग्राफिक्स डिझायनर म्हणून नोकरी करायचा. तो मूळचा कोल्हापूरचा आहे. धायरी परिसरात तो मैत्रिणीसोबत फ्लॅट भाड्याने घेऊन लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता. त्याची मैत्रिण देखील ती नर्सिंगचे शिक्षण घडते.ती कोल्हापूरची आहे. पण ती सध्या गावी गेली होती. घटनेच्या दिवशी महेश घरी फोनवर मोठ मोठ्याने बोलत होता. त्यामुळे रात्री घरमालकाने कारण विचारण्यासाठी दरवाजा वाजवला पण प्रतिसाद न आल्याने त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नैराश्येतून ही आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलिसांनी त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला आहे.पण तरूणाने नैराश्येतून टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. त्याला नेमके कशामुळे नैराश्य आले होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.