Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे सरकारचा दुस-या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

इच्छुकांना संधी मिळणार का? शिंदे गटातील धाकधूक वाढली

मुंबई दि १८ (प्रतिनिधी) – राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्या विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे. सरकारमध्ये सध्या राज्यमंत्री पदाच्या जागा रिक्त असून काही कॅबिनेट मंत्री पदे बाकी आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा इच्छुकांकडून लाॅबिंग सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नाराजांची नाराजी जाणार की त्यात वाढ होणार हे पहावे लागेल.

राज्यातील सत्तांतरानंतर ३० जूनला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती.तर ९ ऑगस्टला पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. आता दुस-या मंत्रीमंडळ विस्तारासाठी दसऱ्याच्या मुहूर्त ठरल्याची चर्चा आहे.सध्या सरकारमध्ये २० मंत्री आहेत. पण या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर विस्तारानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली होती. पण आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन इच्छुक आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी ५ आॅक्टोबर म्हणजे दस-याचा मुहूर्त ठरला आहे.

पहिल्या विस्तारात शिंदे गटाच्या अनेक इच्छुकांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्या गटातील नाराजी उघड झाली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार का हे लवकरच समजणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील एकही मराठी चेहरा मंत्रिमंडळात नाही. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात कोण मंत्रीपदाचे सीमोल्लंघन करणार आणि कोणाला वनवास होणार याची उत्सुकता असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!