Latest Marathi News
Ganesh J GIF

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

वर्षाभरापुर्वीच झाले होते लग्न आणि घटस्फोटही, टोकाचे पाऊल का उचलले?, पोलीसांसमोर आव्हान?

पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उरुळी कांचन येथील तरुणीने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोनाली धनाजी धुमाळ असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनाली हिचे काही वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे उरुळी कांचन या ठिकाणी आपल्या आई-वडिलांबरोबर राहत होती. मागील काही दिवसांपासून ती बारामती येथील पोलिस भरती प्रशिक्षण केंद्रात पोलिस भरतीची तयारी करत होती. सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ च्या दरम्यान घरी कोणी नसताना सोनालीने ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी लोणी काळभोर पोलिसांनी भेट दिली असून, पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत. या तरुणीने असं का केलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही. त्यामुळे पोलीसांसमोर तपासाचे आव्हान असणार आहे.

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील टिळेकरमळा परिसरातील जिल्हा परिषद शाळेजवळ सोमवारी ही घटना घडली आहे. सोनालीने टोकाचे पाऊल का उचलले. ती कोणत्या तणावातून जात होती. याचा उलगडा झाल्यानंतर आत्महत्येचे खरे कारण समोर आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!