Latest Marathi News
Ganesh J GIF

सुजय विखे, संदीपान भुमरे ते वसंत मोरे, स्वत:ला मतदान करु शकले नाहीत, कारण….

राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदानाला  सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालीय. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकात कोट्यवधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे.परंतु सुजय विखे-पाटील , संदीपान भुमरे आणि वसंत मोरेंना  या तीन उमेदवारांना मतदान करता आले नाही. कारण तिथल्या मतदारयादीत त्यांची नोंद नसल्यानं त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

अहमदनगरमधून सुजय विखे-पाटील, छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे आणि पुण्यातून वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहे. पण या तीन उमेदवारांना स्वतःला मतदान करता येत नाही. ज्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत, तिथल्या मतदार यादीत त्यांची नोंद नसल्यानं त्यांच्यावर ही वेळ आलीय. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधले महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि पुण्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचा समावेश आहे. संदीपान भुमरेंचं मतदान जालना मतदारसंघातल्या पैठणमध्ये आहे, सुजय विखेंचं नाव शिर्डी मतदारसंघातल्या लोणीमधल्या मतदारयादीमध्ये आहे तर वसंत मोरे यांचं नाव कात्रजमधल्या मतदारयादीत असून हा भाग शिरुर मतदारसंघाला जोडलेला आहे.

डॉ. सुजय विखे-पाटील यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना उभारला होता. सुजय विखे पाचलांनी भाजपकडून 2019 मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक नगरमधून लढवली आणि ते विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा त्यांनी पराभव केला होता. आता ते महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने लक्षवेधी ठरत असते. यंदा ते महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे वंचितकडून निवडणूक लढवत होते. वसंत मोरे यांची स्वतःच्या जीवावर निवडून येणारे नेते अशी ओळख आहे. वसंत मोरे हे लोकसभेसाठी निवडणक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी मनसेचा राजीनामा देत वंचितकडून निवडणूक लढवत आहे. 2007 साली पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेने 8 नगरसेवक निवडून आणले होते. मनसेच्या या यशात वसंत मोरेंचा सिंहाचा वाटा होता. वसंत मोरे या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. राज ठाकरे यांच्यासोबत गेल्या 28 ते 29 वर्षांपासून होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!