Latest Marathi News
Ganesh J GIF

सुनेत्रा पवार खासदार होणार? समोर आली मोठी माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीय. राज्यसभेची उमेदवारी ठरवण्यासाठी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बुधवारी रात्री बैठकसुद्धा पार पडली.या बैठकीत काही वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. छगन भुजबळ यांनीही नाराजी व्यक्त केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे.सुनेत्रा पवार यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रात मंत्रीपद घेतलेलं नाही. त्याबदल्यात राष्ट्रवादीला भाजपच्या कोट्यातली जागा मिळणार असल्याची माहिती समजते. महाराष्ट्रातून भाजपच्या दोन राज्यसभेच्या जागा रिक्त होत आहेत. त्यातली पीयूष गोयल यांची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाणार आहे.

अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज्यसभेबाबत भाष्य केलं होतं. आमचे आणखी दोन जण राज्यसभेवर जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले होते. आता दोघे कोण जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीसाठी खुद्द अजित पवार तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र पक्षातील सहकाऱ्यांकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. तर अजित पवार यांच्याकडून बाबा सिद्दिकी यांच्या नावासाठी तयार असल्याचं म्हटलं जात आहे.मंत्री छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र त्यांच्याऐवजी सुनेत्रा पवार यांचे नाव उमेवारीसाठी पुढे असल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडणार का? पक्षात भूकंप होणार अशी चर्चा रंगली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!