Latest Marathi News
Ganesh J GIF

सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको, जयंत पाटील यांची खोचक टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर शेकाप नेते जयंत पाटील यांनी अतिशय खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी बंड पुकारत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या या निर्णयाला जवळपास 40 आमदारांनी पाठिंबा दिला. तसेच पक्षातील दिग्गज नेते सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना साथ दिली.

सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महायुतीची दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली तेव्हा तिथे अजित पवार यांच्यासोबतही सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. सुनील तटकरे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण यावरुन शेकाप नेते जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत निशाणा साधलाय.

“सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. मुरुडमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात जयंत पाटील यांची सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. त्यांच्या या टीकेवर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते, स्वत: अजित पवार किंवा सुनील तटकरे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“बाळाराम पाटील यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा राष्ट्रवादीचा एकमेव माणूस भुसार आहे. सर्वांनी फसवलं. आमची मतं एवढी नव्हती. आमची 5 हजारच मतं होती. आम्ही 11 हजारापर्यंत गेलो कारण बाळाराम पाटलांनी चांगलं काम केलं. प्रत्येक शाळेमध्ये गेले आणि काम केलं. बंधूंनी पुन्हा फसवलं. मी बाळाराम साहेबांना बोललो की, नको उभा राहूस. विधानसभेला उभा राहा. पण ऐकलं नाही. त्याचा विश्वास. नुसती तुमची चार संस्थांची कामे मिळाली असती. स्वामी गेली, रयत गेली, दादा म्हणजे का? दादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे. ही जी परिस्थिती आहे ती आम्ही कधी विसरणार नाहीत”, असं जयंत पाटील म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!