वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टिंगरे निवडणुकीच्या मैदानात ; रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे राष्ट्र्वादी कॉंगेस अजित पवार पक्षाकडून सुनील टिंगरे यांनी रॅलीच्या माध्यमातून सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.धानोरी गाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून आमदार सुनील टिंगरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. धानोरी, विश्रांतवाडी, नागपूर चाळ मार्ग येरवडा येथे या रॅलीचा समारोप झाला.
सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांच्याकडे अर्ज दाखल केला. या वेळी मतदारसंघातील नागरिकांनीही रॅलीत सहभाग घेतला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे, नेहा शिंदे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे, माजी नगरसेवक सतीश म्हस्के, सुनीता गलांडे, संदीप जराड, उषा कळमकर, मीनल सरोदे, पांडुरंग खेसे, बंडू खांदवे, चंद्रकांत टिंगरे, शशी अण्णा टिंगरे, सुनील जाधव, शंकर संगम, प्रकाश भालेराव, प्रदीप देशमुख, दत्ता सागरे आदी उपस्थित होते.
यावेळी सुनील टिंगरे म्हणाले, “राज्यातील महायुती शासनाने शेतकरी, महिलांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही लाभ बहुसंख्य महिलांना मिळालेला आहे. शहरी भागासाठी मोठ्या प्रमाणात निधीही दिला आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविणार आहे.”