Latest Marathi News
Ganesh J GIF

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, अनिल देशमुखांना अडचणीत आणणारे परमवीर सिंह

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात चर्चेत आलेले मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे आज निलंबन मागे घेण्यात आले आहे. परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे संपूर्ण राज्यात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करून महाविकास आघाडीला मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अडचणीत आणलं होतं. यामुळे अनिल देशमुख यांना अटक देखील करण्यात आली होती. डिसेंबर २०२१ मध्ये परमबीर सिंग यांना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने निलंबीत करत असल्याचे आदेश जारी केले होते. मात्र आता हा निर्णय शिंदे सरकारने रद्द केले आहेत. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधातील सर्व आरोप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. तसेच महाराष्ट्रातील सत्ताधारी शिंदे सरकारने परमबीर सिंग यांच्या निलंबनाचा आदेशही रद्द केला आहे. परमबीर यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांना त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. तब्बल सात महिने ते अज्ञातवासात होते. ठाणे आणि नवी मुंबईतील पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात खंडणी वसूल करणे आणि अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल होते. त्याचबरोबर परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने पाच स्वतंत्र गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे यापूर्वी मुंबई पोलिसांनी नोंदवले होते. यामुळे वादाची शक्यता आहे.

ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजेच शिस्त आणि अपील नियम, १९६९ च्या नियम ८ अंतर्गत परम बीर सिंह, IPS (निवृत्त) यांच्या विरुद्ध ०२/१२/२०२१ रोजी जारी केलेले आरोपपत्र मागे घेण्यात आले आहे आणि हे प्रकरण बंद करण्यात येत आहे, सरकारचे संयुक्त सचिव वेंकटेश भट यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!