Latest Marathi News
Ganesh J GIF

भीषण! ओडिशा रेल्वे अपघातात २३८ लोकांचा मृत्यू

भारतातील २०१६ नंतरचा सर्वात मोठा रेल्वे अपघात ९०० जण जखमी, बचावकार्य सुरु, मदतीची घोषणा

ओडीसा दि ३(प्रतिनिधी)- ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी दोन पॅसेंजर आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा २३८ झाला आहे. तर ९०० प्रवासी झाले आहेत. अलीकडच्या काळातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रलला जात असताना बहंगा बाजार स्थानकावर सायंकाळी ही घटना घडली. सर्वप्रथम यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस रुळावरून घसरली. त्याचे काही डबे दुसऱ्या रुळावरून उलटले आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. यानंतर कोरोमंडल ट्रेनच्या काही बोगीही रुळावरून घसरल्या. या बोगी दुसऱ्या ट्रॅकवर असलेल्या मालगाडीला धडकल्या. देशभरातून वेगवेगळी पथक ओडिशाला मदतीसाठी रवाना झाले आहेत. दुर्घटना खूप मोठी आहे. एका गाडीत १६०० प्रवाशी होते, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, भारताच्या इतिहासातील ही सर्वात भयानक रेल्वे दुर्घटना आहे. दरम्यान, विविध रुग्णालयात दाखल जखमी प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी लोक मोठ्या संख्येने रक्तदान करत आहेत. रुग्णालयाबाहेर रक्तदात्यांच्या रांगा लागल्या आहेत. बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ घडलेल्या या अपघातानंतर आतापर्यंत १८ गाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. हा रेल्वे अपघात हा अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तसचं या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रुळावरुन कसे घसरले, याची चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये मदत जाहीर केली. याशिवाय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!