Latest Marathi News
Ganesh J GIF

भयंकर ! नवीन आयुष्याची स्वप्न रंगवणाऱ्या नवदांपत्याचा दुर्दैवी अखेर

लग्नानंतर काही तासातच नवदांपत्याचा अपघाती मृत्यू, आनंदी सोहळ्यावर दुःखाचा डोंगर

बिहार दि ७(प्रतिनिधी)- विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो. विवाहानंतर प्रत्येकाच्या नवीन आयुष्याला सुरवात होते. पण बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एक नवदांपत्यासाठी विवाहाचा दिवसच अखेरचा ठरला आहे. नववधूला वर आपल्या नव्या वाटचालीसाठी घेऊन जात असताना कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील पुरानी गावाजवळ हा अपघात घडला. सतुआ गावातील कारू चौधरी यांची मुलगी पुष्पा हिचा विवाह नवाडा येथील महाराणा गावातील रहिवासी श्याम याच्याशी ठरला होता. लग्नविधी उरकल्यानंतर इनोव्हा कारमधून श्याम आपली नववधू पुष्पा आणि मेहुणीसह महाराणा गावाकडे निघाले होते. त्यावेळी दुपारी ३-४ वाजण्याच्या दरम्यान त्यांची कार पुरैनी गावाजवळ आली असता भरधाव वेगात असलेल्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने कारला जोरदार धडक दिली. यामुळे कार रस्त्यावरून खाली गेली. श्याम आणि पुष्पा यांचा जागीच मृत्यू झाला. यात श्यामचा मेहुणा आणि गाडीचा चालक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून वधू-वरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर गंभीर जखमी मेहुणीला उपचारासाठी विम्स येथे दाखल केले. या घटनेची माहिती कुटुंबीयांना समजताच सर्वत्र शोककळा पसरली. सुखाचं वातावरण क्षणार्धात दु:खात बदलले. कारला धडक दिल्यानंतर आरोपी चालक ट्रॅक्टरसह फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या भागात दररोज मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाळू उपसा करणारे लोक ट्रकमधून वाळू भरून रस्ता सोडून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे दररोज अपघात होत आहेत. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांशी पोलिसांचीही मिलीभगत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!