या अभिनेत्रीने नेसली चक्क २४ कॅरेट सोन्याची साडी
साडीसोबत त्या कृतीचीही सोशल मिडीयावर चर्चा, व्हिडिओ व्हायरल, बघा काय घडले
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. १६ जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे. यावेळी चित्रपटाचे खास स्क्रिनिंग शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी क्रिती सेनाॅनने नेसलेल्या साडीची जोरदार चर्चा रंगली होती, त्याचे कारणही खास होते.
हैदराबादमध्ये ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरचे खास स्क्रीनिंग करण्यात आले होते. ट्रेलर लॉंचिंगवेळी चित्रपटातील प्रत्येक कलाकार कथेला आणि पात्राला अनुसरून पारंपरिक पोशाख परिधान करून आले होते. यावेळी क्रितीने या वेळी पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची साडी नेसली होती. क्रितीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. ती साडी २४ कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. डिझायनर अबू जानी संदीप खोसलाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून क्रितीच्या या लूक आणि साडीबद्दल माहिती दिली आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमावेळी क्रितीला बसण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती, परंतु जराही विचार न करता ती थेट जमिनीवर बसली. यानंतर त्या ठिकाणी उपस्थित लोकांनी तिला खुर्चीवर बसण्याची विनंती केली, पण तिने जमिनीवर बसणे पसंत केले. तिच्या या कृतीचे नेटक-यांनी काैतुक केले आहे. याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आदीपुरुष सिनेमासाठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतलं याची चर्चा रंगू लागली आहे. या चित्रपटासाठी प्रभासने तब्बल १५० कोटी रुपये मानधन घेतलं आहे.तर क्रितीने ३ कोटी रुपये मानधन घेतलं आहे. तर सैफने १२ कोटी रुपये फी घेतली आहे. तर सनी सिंगने दीड कोटी रुपये मानधन घेतले तर मराठमोळ्या देवदत्त नागेने ६ कोटी घेतल्याची चर्चा आहे.