गायकाच्या गाण्यावर खुश होत प्रेक्षकांनी पाडला नोटांचा पाऊस
प्रेक्षकांकडून नोटांची उधळण करतानाचा व्हिडिओ व्हायरल, बघा कोण आहे गायक
वलसाड दि १२(प्रतिनिधी)- गुजरातमधील वलसाड येथील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये गायक कीर्तीदान गढवी यांच्यावर प्रेक्षकांनी चक्क नोटांचा वर्षाव केला आहे.वलसाडमध्ये हा कार्यक्रम ११ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता.
स्वामी विवेकानंद नेत्र मंदिर ट्रस्टच्या वतीने नवीन नेत्र रुग्णालयाच्या उद्घाटनानिमित्त भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी गुजराती लोकगायक कीर्तिदान गढवी आणि उर्वशी रादाडिया यांना आमंत्रित करण्यात आले होते. कलाकारांनी आपल्या आवाजाने आणि भजन गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यामुळे या कार्यक्रमात आलेल्या प्रेक्षकांनी गायक कीर्तीदान यांच्यावर नोटांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली.यावेळी लोकांनी गायकांवर ५० लाखांहून अधिक रुपयांचा वर्षाव केल्याचे सांगितले जात आहे. गायक गढवी नेहमीच चर्चेत असतो. गेल्या वर्षी देखील त्याच्या संगिताच्या कार्यक्रमातला असाच एक व्हिडिओ समोर आला होता. दरम्यान, गेल्या महिन्यात गुजरातमधील मेहसाणा येथील एका लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये नोटांचा पाऊस पडत होता.
गढवी यांना अमेरिकेत ‘वर्ल्ड अमेझिंग टॅलेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते वर्ल्ड टॅलेंट ऑर्गनायझेशन, यूएसएचे ब्रँड ॲम्बेसेडरही राहिले आहेत. ‘लडकी’, ‘नगर में जोगी आया’ आणि ‘गोरी राधा ने कालो कान’ ही त्यांची लोकप्रिय गाणी आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रेक्षक नोटा उधळताना कायम. दिसून येत असतात.