Latest Marathi News
Ganesh J GIF

विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामची धुरा आता यांच्या खांद्यावर

भाजपाकडे आमदारकी सोबत सत्तेतही वाटा मागणार

पुणे दि २०(प्रतिनिधी)- शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पण आता शिवसंग्राममधून
त्यांच्या पत्नीला आमदारकी देण्याची मागणी केली जात आहे. राज्यपाल कोट्यातून भाजपने डॉ. ज्योती मेटे यांना विधानपरिषदेवर नियुक्त करावे, आणि सत्तेत सहभागी करावे, अशी मागणी संघटनेकडून केली जाणार आहे.

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ भातण बोगद्याच्याजवळ मेटे यांची गाडीवर ट्रकला जोरदार धडकली होती. हा आघात इतका मोठा होता की, मेटे यांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे जखमी झाले. या संशयास्पद अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.दरम्यान शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत ज्योती मेटे यांच्या आमदारकीच्या मागणीची माहिती दिली. शिवसंग्रामच्या आमदार भारती लव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली येत्या २४ ऑगस्ट रोजी शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.त्यावेळी ही मागणी केली जाणार आहे. राष्ट्रवादीनेही या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे ज्योती मेटे या विनायक मेटे यांच्या नंतर शिवसंग्रामची धुरा संभाळणार आहेत.


विनायक मेटेंचे अपघाती निधन अनेकांना चटका लावून गेलेले आहे एक रंगारी ते विक्रमी आमदार अशी कामगिरी त्यांनी केली होती.त्यांच्या संशयास्पद अपघातात ड्रायव्हरचा समावेश असल्याची चर्चा होती. पण तपासात पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!