Just another WordPress site

ग्रामपंचायत कदमवाकवस्ती मध्ये महिला बचतगटांसाठी कार्यशाळेचे आयोजन

पुणे दि २० (प्रतिनिधी)-  ग्रामपंचायत कदमवाकवस्ती व आनंदी परिवार फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कदमवाकवस्ती मधील महिला बचत गटांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन केले होते,ही कार्यशाळा मधुबन कार्यालयात पार पडली.

कार्यशाळेचे उद्घाटन करण्यासाठी मा.सौ.शालिनीताई कडू मॅडम (प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प पुणे) यांना आमंत्रित केले होते,यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन पार पडले, यावेळी शालिनीताई यांनी  महिलांना मार्गदर्शन केले ,महिलांसाठी असणाऱ्या विविध योजना इत्यादी ची माहिती दिली ,तसेच यानंतर कदमवाकवस्ती गावच्या सरपंच गौरीताई गायकवाड यांनी महिलांना अतिशय सुंदर पध्दतीने मार्गदर्शन केलं व आनंदी परिवार फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुमार गायकवाड यांनी महिलांसाठी कार्यशाळा घेतली ,त्यांनी महिलांशी विविध विषयांवर संवाद साधला,व्यवसाय विषयक अनेक गोष्टी,बारकावे इत्यादी महिलांना सांगितले, पैसा कसा वापरला पाहिजे ,कसा कमावला पाहिजे असे अतिशय अनमोल मार्गदर्शन त्यांनी महिलांना केले व अतिशय चांगल्या वातावरण हा कार्यक्रम पार पडला

GIF Advt

यावेळी कार्यक्रमास उपस्थित मा.सौ.शालिनीताई कडू मॅडम,सरपंच मा.सौ. गौरीताई चित्तरंजन गायकवाड ग्रामपंचायत सदस्या-वैजयंताताई कदम, राजश्रीताई काळभोर, सविताताई साळुंखे, मधुरीताई काळभोर तसेच माजी सदस्या वसुधाताई केमकर,पोलीस पाटील प्रियांकाताई भिसे,ग्रामसेवक घोळवे साहेब,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच बचत गटांमधिल महिला उपस्थित होत्या,कार्यक्रमाचे आभार चित्तरंजन गायकवाड यांनी मानले व सूत्रसंचालन सिद्धेश कायगुडे यांनी केले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!