
संतोष देशमुख यांच्या हत्येदिवसाचे ते सीसीटीव्हीत फुटेज व्हायरल
देशमुख यांची हत्या करून 'ती' स्कॉर्पिओ सोडून आरोपी पळाले, पोलीसांसमोर ते आरोपी पळाले
बीड – बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत अनेक जणांना अटक केली आहे. या प्रकरणी आता आरोपींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवसाचा व्हिडीओ समोर आला आहे. यात आरोपी पळताना दिसत आहेत. ९ डिसेंबर २०२४ चा संध्याकाळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाला आहे. यात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धाराशिवच्या वाशीमध्ये आरोपी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ सोडून ६ आरोपी पळून जाताना दिसून आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हत्येनंतर वाशी शहरातील पारा चौक या ठिकाणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि त्याचे साथीदार पोहोचले. त्या ठिकाणाहून स्कॉर्पिओ गाडी सोडून ते पळून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतरचे हे फुटेज आहे. विशेष बाब म्हणजे संतोष देशमुख यांचे मारेकरी भर रस्त्यात गाडी लावून पळून गेले होते आणि यावेळी अगदी काही अंतरावर पोलीस होते. त्यांना सहज या आरोपींना पकडता आले असते. पण पोलिसांनी त्याचा पाठलाग केला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. संतोष देशमुखांच्या अपहरणासाठी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वापरली होती. याच काळ्या रंगाच्या गाडीतून संतोष देशमुख यांचा अपहरण करण्यात आले होते. संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. दरम्यान या फुटेजमुळे कराड आणि साथीदार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
देशमुख हत्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह आणखी काही जणांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. पोलिसांचे आणि सीआयडीचे पथक आरोपींच्या मागावर आहेत. पण अद्याप त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.