Latest Marathi News
Ganesh J GIF

‘प्रत्येक खात्यामागे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला तीनशे रूपये मिळतात’

निलंबित पोलीस अधिकारी कासलेचे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप, व्हिडीओ व्हायरल, आरोप काय?

मुंबई – निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले याची खळबळजनक गाैप्यस्फोटाची मालिका सुरूच आहे. कारण आता त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.

अॅक्सिस बँकेत खाते उघडण्यासाठी पोलिसांना धमकावले जाते आणि प्रत्येक खात्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ३०० रुपये मिळतात असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. वाल्मीक कराड याचा एन्काऊंटर करण्याची ऑफर आपल्याला देण्यात आली होती, असा दावा करत कासले याने खळबळ उडवून दिली होती. पण आता पुन्हा एकदा कासले चर्चेत आले आहेत. ते म्हणाले, अमृता फडणवीस या ऑक्सिस बँकेत अधिकारी आहेत. त्यामुळे प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यावर ऑक्सिस बँकेतच खाते उघडण्यासाठी दबाव आणला जातो. पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असे मिळून ३ ते ४ लाख अकाऊंट होतात, मग अमृता फडणवीस यांना प्रत्येक अकाऊंटमागे ३०० रुपये मिळाले तर जवळपास दहा कोटी रुपये होतात आणि याला पुराव्याची गरज नाही, असे कासले याने व्हिडीओत म्हटले आहे. कासलेचा हा व्हिडीओ एका वकील महिलेने अमृता फडणवीस यांना टॅग केला आहे. हा व्हिडीओ पाहता रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच या गंभीर आरोपानंतर अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून या आरोपांला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, मुंबई पोलिसांना दखल घेण्याची विनंती केली आहे.

https://x.com/fadnavis_amruta/status/1913652850472722588?t=AWWvw_J6mO82W0XVM4DlPw&s=19

ॲड प्रज्ञा पवार तुम्ही चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहात? तुम्ही माझ्यावर पोलीसांच्या अकाऊंटसाठी ॲक्सिस बँकेकडून प्रत्येकी ३०० रुपये घेतल्याचा आरोप करत आहात? तुमच्या या खोट्या राजकीय अजेंड्यात मला का ओढत आहात? मुंबई पोलीस कृपया याची दखल घ्यावी? असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!