Latest Marathi News
Ganesh J GIF

मुलाने प्रेमविवाह केल्याने सासरच्यांनी सुनेला जिवंत जाळले

महाराष्ट्रात थरकाप उडवणारी घटना, सासूला सुन म्हणून हवी होती भावाची मुलगी पण किर्तीने...

अहिल्यानगर – सासू आणि सासरा यांनी आपल्या सुनेला जाळून ठार मारल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

कीर्ती अनिकेत धनवे असे या घटनेत खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार किर्ती आणि अनिकेत यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यामुळे दोन वर्षापूर्वी दोघांनी प्रेम विवाह केला होता. पण अनिकेची आई करुणा व वडील अंकुश यांना हा विवाह मान्य नव्हता. कारण करुणा धनवे यांच्या भावाची मुलगी त्यांना आपल्या मुलाला पत्नी म्हणून करावयाची होती .मात्र मुलाने प्रेम विवाह केल्याने त्यांना कीर्ती विषयी राग होता. ते किर्तीला सुन मानत नव्हते, तसेच तिच्यासोबत नीट वागत नव्हते. घटनेच्या दिवशी तिच्या आजे सासरे यांच्यासाठी स्वयपाक करण्यासाठी शेतात गेली होती. त्यावेळेस जाळून ठार मारले. पण छपराला आग लागून जळून मेल्याचा बनाव केला. मारले. या प्रकरणी नवरा अनिकेत अंकुश धनवे, सासू करुणा अंकुश धनवे, सासरे अंकुश होनाजी धनवे आणि साथीदारांनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कीर्ती धनवे ही या घटनेत शंभर टक्के जळाल्याने तिच्या शरीराचा कोळसा झाला होता. तिचा मृतदेह पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात येताच कीर्तीचे वडील आणि आई यांनी एकच टाहो फोडला होता. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!