
…म्हणून विवाहित महिलेने केले लोन रिकव्हरी एजंटशी लग्न
अजबगजब लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, लोनवाली लव्हस्टोरी पाहून चक्रावून जाल! महिलेचा अजब दावा
जमुई – बिहारमध्ये एका महिलेने सतत छळ करणाऱ्या पतीला कंटाळून कर्जाचे हफ्ते गोळा करण्यासाठी आलेल्या लोन रिकव्हरी एजंटशी लग्न केल्याची सजबगजब घटना समोर आली आहे. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
इंद्रा कुमारीने तिचा दारुडा पती नकुल शर्माला कंटाळून एका मंदिरात लोन रिकव्हरी एजेंट पवन कुमार यादवशी लग्न केलं. मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रा कुमारीचं लग्न २०२२ मध्ये चकाई येथील रहिवासी नकुल शर्मा याच्याशी झालं होतं. पण नकुलच्या दारूच्या व्यसनामुळे आणि घरगुती हिंसाचारामुळे इंद्रा त्रासली होती. काही कामधंदा करावा म्हणून तिने एका बँकेतून कर्ज काढले होते. पण तिचे काही हप्ते थकले होते. त्यामुळे लोन रिकव्हरी एजंट कर्जाचे पैसे मिळव्यासाठी सतत घरी येत असे. यादरम्यान तिची फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या लोक रिकव्हरी एजंट पवन कुमार यादवशी भेट झाली. पवन कुमार कर्जाचे थकलेले हफ्ते मिळवण्यासाठी घरी गेले असता त्यांच्यात व्यावसायिक चर्चा सुरु झाली होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ४ फेब्रुवारी रोजी दोघेही घरातून पळून गेले आणि आसनसोलला पोहोचले, जिथे इंद्राची मावशी राहते. यानंतर ११ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन वीकमध्ये दोघांनीही जमुई येथील त्रिपुरारी घाट येथील शिव मंदिरात लग्न केलं. या लग्नाला त्यांच्या ओळखीतील, नात्यातील अनेक लोक उपस्थित होते. यानंतर त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पवनच्या कुटुंबाने या लग्नाला मान्यता दिली. पण इंद्र कुमारीच्या कुटुंबाने या लग्नाला विरोध केला आहे. पण इंद्राने आपण आपल्या स्वेच्छेने पवनशी लग्न केल्याचं सांगितलं आहे. तर पवनने इंद्रावर त्याचं प्रेम असून दोघेही आता एकमेकांसोबत राहू इच्छितात असं म्हटले आहे.
इंद्राचं कुटुंब या निर्णयावर नाराज आहे. इंद्राच्या कुटुंबाने पवनविरुद्ध चकाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला आहे. त्यामुळे इंद्रा आणि पवन यांनी प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली आहे. सध्या या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.