
आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यातील वेतलापलेम गावामध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. एक फटाखा फॅक्टरीमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्यााची माहिती समोर आली आहे. अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यातील वेतलापलेम गावामध्ये दुपाराच्या सुमारास ही घटना घडली. अचानक एका फटाका उत्पादक कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, अख्ख गाव हादरलं. गृहमंत्री वंगालपुडी अनिता यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला असून स्फोटामध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या स्फोटामध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.


