Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रसिद्ध अभिनेत्रीने पुण्यात नवीन घरात केला गृहप्रवेश

गृहप्रवेशाचा व्हिडिओ व्हायरल, पूजा व गृहप्रवेशाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली....

पुणे दि १३(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसुबाईची भूमिका साकारली होती. आता एक व्हिडीओ पोस्ट करत प्राजक्ताने तिच्या चाहत्यांशी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

प्राजक्ताने नुकतंच नवं घर घेतलं आहे.नुकताच तिने या घरात गृहप्रवेश केला आहे. घरातील गृहप्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा याचा एक व्हिडिओही तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्राजक्ता तिच्या संपूर्ण कुटुंबासह या घरात राहायला आली आहे. व्हिडीओत प्राजक्ता पूजेचा कलश डोक्याला लावताना दिसतेय. तिचं घर अतिशय सुंदर सजवण्यात आलं आहे. घरात मोठासा लाकडी देव्हाराही आहे. घराचं इंटेरिअरदेखील खास आहे. प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वी या घराची वास्तुशांती केली होती.. त्यानंतर घराच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. आता हे घर बांधून पूर्ण झालं आहे. नवीन घराचं स्वप्न पूर्ण झालं. मेहनतीचं फळ मिळालं, अशी भावना प्राजक्ताने व्यक्त केली आहे. दरम्यान प्राजक्ताला तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या नम्र स्वभावासाठीही ओळखले जाते. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर प्राजक्ताही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी सांगत असते. प्राजक्ता शिक्षण पूर्ण करण्यासोबतच वेगवेगळ्या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लवकरच तिची प्रमुख भूमिका असलेला सिंगल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या प्राजक्ता कम्प्युटर इंजिनिअरिंगचे धडे गिरवत आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी आणि ‘आई माझी काळूबाई’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी प्राजक्ता सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. फार कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण करून आपली ओळख निर्माण केली आहे. प्राजक्ता केवळ २५ वर्षांची आहे. वयाच्या २५ व्या वर्षी तिनं स्वत:चं घर खरेदी केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!