
अजित पवारांना अडचणीत आणणारा बाबाही अडचणीत
बाबाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, अजित दादांच्याही अडचणी वाढणार, नेमके काय घडले?
सोलापूर – अवैध मुरूम उत्खनन थांबवण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा गेल्यानंतर त्यांना फोन कॉलच्या माध्यमातून कारवाई थांबवण्याचा आदेश दिल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. पण ज्या कार्यकर्त्यामुळे दादा अडचणीत आले आहेत त्या जगताप याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बाबा जगताप हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा माढा तालुका अध्यक्ष आहे. कुर्डू गावामध्ये कथित अवैध पद्धतीने मुरूम उपसा चालू असताना अंजना कृष्णा यांनी रोखल्यानंतर याच बाबा जगताप याने अजित पवार यांना कॉल करून त्यांचे अंजना कृष्णा यांच्याशी संभाषण घडवून आणले होते. त्यानंतर अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना चांगलेच दरडावून सांगत सध्या सुरू असलेली कारवाई थांबवा असा आदेश फोन कॉलद्वारे दिला होता. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून हा आदेश द्या, असे म्हटल्यानंतर अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना चांगलेच सुनावले होते. मी राज्याचा उपमुख्यमंत्री बोलतोय. मी तुमच्यावर कारवाई करेन, असेही यावेळी अजित वार यांनी अंजना कृष्णा यांना खडसावून सांगितले होते. या प्रकरणावरून अजित पवारांना जाहीर माफी मागावी लागली आहे. पण आता त्या बाबा जगताप याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तो एका खुर्चीवर बसल्याचे दिसत आहे. त्याच्या समोर एक टेबल आहे. खुर्चीवर बसून तो कशाचीतरी नशा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे नशा करताना वापरत असलेले साधनही तो व्हिडीओत दाखवताना दिसत. बाबा जगतापचा हा व्हिडीओ समोर आल्यामुळे आता त्याच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी थेट आयपीएस अधिकारी यांच्या शिक्षणाची चौकशी करावी अशी मागणी केली होती. पण आता त्यानी यु टर्न घेत पोलीस दलाची माफी मागितली आहे.