Latest Marathi News
Ganesh J GIF

तरूणीने विरोध किंवा स्ट्रगल केला नाही त्यामुळे आरोपीने बलात्कार केला

गृह राज्यमंत्र्यांचे धक्कादायक वक्तव्य, पोलिसांची पाठराखण? आरोपीचे लोकेशन सापडले?

पुणे – पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. यातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

योगेश कदम यांनी आज स्वारगेट बस स्थानकाला भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, स्वारगेटमध्ये परवा जी घटना घडली आहे त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुल कृती झाली नाही. ही घटना घडली तेव्हा शिवशाही बसच्या आजुबाजूला १० ते १५ लोक होते. पण तरुणीने विरोध केला नसल्याने कोणालाही शंका आली नाही आणि त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला. स्वारगेट बस स्थानकात जी घटना घडली याबाबत मी माहिती घेतली आहे. त्यादिवशी स्वारगेट पोलिसांकडून रात्री १२ ते पहाटे सहा वाजेपर्यंत कितीवेळा गस्त घालण्यात आली, हे सीसीटीव्हीत दिसत आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक रात्री दीड वाजता एसटी स्टॅंडच्या आवारात आले होते. त्यानंतर रात्री तीन वाजता देखील पोलीसांचे पथक स्वारगेट बस स्थानकावर आले होते. त्यामुळे पोलिसांकडून दुर्लक्ष झाले, ते सावध नव्हते. या आरोपात तथ्य नाही, असं योगेश कदम पत्रकार परिषदेमध्ये म्हंटले आहे. पुणे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केला आहे. त्यानुसार शहरातील नागरिकांनी आरोपी बाबत माहिती असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा असा आव्हान देखील त्यांच्याकडून करण्यात आला आहे. या घटनेने विरोधकांकडून ही संताप व्यक्त केला जात असून सत्ताधारी सरकारवर आरोप केले जात आहेत. तसेच घटना लपवली नसून तपासाची दिशा योग्य रहावी यासाठी खबरदारी घेण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. असे म्हणत कदम यांनी पोलिसांचा बचाब केला आहे.

पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार होता, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. . या प्रकरणात स्वारगेट स्थानकात तैनात असलेले २३ सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!