
नव्या नवरीचा अनोखा डान्स पाहून नवरदेवही लाजून लाल
धमाल डान्सचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, पाहुणे पाहतच राहिले, डान्स एकदा बघाच!
पुणे – अलीकडे लग्न म्हटले की, डान्स हा झालाच पाहिजे, असा नियम झाला आहे. कधी कधी नवरा नवरीसुद्धा डान्स करत उत्साहात भर घालतात. पण सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यात नवरीचा उत्साह चकित करणारा आहे.
नवरा नवरीचा हळदीच्या समारंभातील एक भन्नाट क्षण व्हिडिओत कैद झाला आहे. ज्यामध्ये नवरीने ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटातील गाजलेलं गाण्यावर इतका भन्नाट डान्स केला आहे की, पाहुणे देखील नवरीचे फॅन झाले. व्हिडिओ दिसत आहे की, हळदीच्या कार्यक्रमानिमित्ताने कुटुंबातील सर्वजण आणि नवरा-नवरी मांडवात आहेत. त्याच वेळी पुष्पा २ या चित्रपटातील ‘अंगारोका’ गाणे वाजते. मग काय नवरीबाई थेट सर्वांसमोर डान्स करण्यास सुरुवात करते. त्यावर ती थांबत नाही तर तिच्या सोबत नवरदेवालाही डान्स करण्यास भाग पाडते. यावेळी नवरीनं केलेला डान्स पाहून नवरदेवही लाजला आहे. पुढे रोमॅंटिक डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत होती. हा व्हिडीओ @allubabloo या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. डान्स पाहिल्यानंतर व्हिडिओला लोकांनी लाखो लाईक्स दिले आहेत शिवाय अनेक व्ह्यूज मिळवून हा व्हिडिओ टॉप ट्रेंडिंगवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे नवरी सोशल मीडियावर स्टार झाली आहे आणि नेटकरी तिच्या आत्मविश्वासाचं भरभरून कौतुक करत आहेत.
https://x.com/allubabloo/status/1880995415111389188?t=qOO_RE3RCSvAnifceFD2kg&s=19
सोशल मीडियावर कायमच अनेक कार्यक्रमातील घटना व्हायरल होत असतात. त्यात लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जात असतात.