Latest Marathi News
Ganesh J GIF

विकृत! नराधमाचा पाळीव कुत्रीवर लैंगिक अत्याचार

सीसीटीव्ही फुटेजमुळे धक्कादायक प्रकार समोर, पुण्यात चाललयं काय?

पुणे – पुण्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात राहणाऱ्या एका पश्चिम बंगालच्या तरुणाने अतिशय संतापजनक कृत्य केले आहे. या तरुणाने कुत्र्यांना खाण्याचे आमिष दाखवून अनैसर्गिक कृत्य केले आहे.

हलीमुद्दीन अनिमल शेख असं या व्यक्तीचं नाव आहे. पुण्यातल्या काळेपडळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हा मुळचा पश्चिम बंगालमधील कांदोरी गावचा रहिवासी आहे. सध्या तो हडपसरमध्ये राहायला होता. तो एका गोडाऊनमध्ये कामाला होता. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुत्री पाळीव आहे. तिचा मालक कामानिमित्त घराबाहेर गेलेला होता. त्यावेळी आरोपीने कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केले. कुत्रीचा मालक घरी आल्यानंतर तिच्या वागणुकीमध्ये त्यांना अचानक बदल जाणवू लागले. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी घरामधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी हा घृणास्पद प्रकार प्रकार समोर आला. या प्रकारामुळे संतापाची लाट पसरली आहे. याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी राजेश पळसकर यांच्यासह इतर स्थानिक नागरिकांना याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ही तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मानसिक विकृतीची अनेक उदाहरणे समोर येत असतात, हे प्रकरण ही विकृतीचे असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!