
नवरदेवाने मंडपातच नव्या नवरीसोबत केले असे काही की….
नवरदेवाच्या धक्कादायक कृतीचा व्हिडिओ व्हायरल, पाहूणेही संतापले, नेमके काय घडले बघाच!
मुंबई – लग्न हे प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपला भावी जोडीदार कसा असेल याची कल्पना करतात आणि जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरते तेव्हा त्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही. पण ही निवड कधीकधी विरुद्ध घडते, असेच काहीसे एका नवरी मुलीच्या बाबतीत घडले आहे.
सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. अशाच एका कपल डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात, पण कही प्रसंग मात्र खूपच विचित्र असतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वर-वधूचे लग्न संपन्न झालं असून यावेळी त्यांचे मित्र दोघांना डान्स करण्यासाठी आग्रह करतात. यावेळी वधू वराचा हात हातात घेऊन नाचायला सुरूवात करते. परंतु यावेळी वराला राग येतो, तो तिला दूर करतो आणि मुद्दाम तिचा हात पकडून गोल गोल फिरवतो, त्यानंतर ती खाली पडते. पण त्यानंतरही तो तिला मारहाण करतो. यावेळी आजूबाजूला उभे असलेले लोक त्याला थांबण्याचा प्रयत्न करतात, यामुळे काही काळ मंडपात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mahaparv_news या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत. अनेकांनी नवरदेवाची कृती चुकीचे असल्याचे म्हटले आहे.