Latest Marathi News

साखरपुड्यातील आनंदावर आग लागल्याने विरजण

शुभकार्यात हाहाःकार, आगीचा व्हिडिओ व्हायरल, पहा काय घडले

टिटवाळा दि २१(प्रतिनिधी)- लग्न साखरपुडा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा आनंदाचा दिवस असतो. पण टिटवाळ्या जवळच्या सांगोडा गावात एका साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त हा आनंद दुखात बदलला. कारण यामुळे मोठी आग लागली होती.

कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील महागणपतीचे स्थान असलेल्या टिटवाळ्याजवळच्या सांगोडा गावात एका साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. पण यावेळी फटक्याच्या ठिगण्या पडल्याने गवताला आग लागली. ही आग झपाट्याने पसरली, त्यामुळे तिथे उभ्या असलेल्या वाहनांना आगीने लक्ष्य केले. पण तिथे उपस्थित तरूणांनी झाडाच्या झावळ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पण तोपर्यंत आगीत वाहने जळून खाक झाली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

साखरपुड्यासारख्या शुभ कार्याच्या ठिकाणी आग लागल्याने हाहा:कार उडाला होता. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त आहे. तालुका पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. या आगीमुळे दुख व्यक्त केले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!