Latest Marathi News
Ganesh J GIF

तिसरीही मुलगीच झाल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळले

पत्नीचा आगीत जळताचा क्षण सीसीटीव्हीत कैद, राक्षस पतीचे भयंकर कृत्य

परभणी – परभणीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. तिसऱ्यांदा मुलगीच झाल्याचा या नराधम पतीला राग आला आणि त्यातूनच त्याने पत्नीला जिवंत जाळले अशी माहिती समोर आली आहे. मैना काळे असे मृत महिलेचे नाव आहे.

मैना यांचे काही वर्षांपूर्वी आरोपी कुंडलिक काळे याच्याशी विवाह झाला होता. त्यांना तीन मुली आहेत. पत्नीला तिसरी मुलगीच झाली म्हणून पतीला राग आला. संतापाच्या भरात त्याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जातो आहे. महिलेची मुलगी भाग्यश्री हिने आरोपी वडिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तिसरी मुलगी झाली म्हणून वडील आईला मारहाण आणि शिवीगाळ करत होते, असं तिने तक्रारीत म्हटले आहे. तसेच वडिलांनी आईला पेट्रोल टाकून पेटवलं, असेही तिने सांगितले आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नाका परीसरात २६ डिसेंबर रोजी हा सगळा प्रकार घडला आहे. दरम्यान पतीने पेटवल्यावर मैना यांनी पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर धाव घेतली. लोकांनी आग विझवली. मात्र ती ९९ टक्के भाजली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखळ होत महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मैना काळे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या बहिणीने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी कुंडलीक काळे याच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

https://x.com/Islamuddin61122/status/1872948226787365039?t=el3FoUIbUQoVNtMSchWAPQ&s=19

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे. आरोपी पतीला कडक शिक्षा झाली पाहीजे. त्यासाठी आपण पोलिस अधिकाऱ्यां बरोबर बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!