Latest Marathi News
Ganesh J GIF

अग्गग ग! बायकोची ती कृती पाहून नवरा लाजला

व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, अनेकांच्या हटके कमेंट, एकदा बघाच!

पुणे – लग्न घर म्हटले की अनेक पाहुणेमंडळी घरी येत असतात. अर्थात सगळेजण या आनंदाच्या क्षणाचा आनंद लुटत असतात. अर्थात लग्नात नवरा नवरी जरी प्रमुख असले तरीही कधी कधी दुसरी एखादी जोडी भाऊ खाऊन जाते.

हल्ली सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. पण लग्नातले व्हिडिओ मात्र हमखास व्हायरल होत असतात. कारण लग्नात अनेक गमतीजमती होत असतात. सध्या सोशल मिडीयावर एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये पत्नी नाचत असून यावेळी तिचा पतीदेखील तिच्यासारखं नाचण्याचा प्रयत्न करतो पण पत्नी नाचत असल्याचे पाहून तो लाजतो. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेकांनी दोघांच्या ट्युनिंगचे काैतुक केले आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shubhjyot0825 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला लाखो लोकांनी पसंती दिली आहे. सध्या तरी व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!