Latest Marathi News
Ganesh J GIF

बाळ होत नसल्याने सासरचे लोक देत होते त्रास, मग महिलेने केलं असं काही ..

नोएडा – नोएडा शहरात एका महिलेला लग्नाच्या तीन वर्षानंतरही अपत्य न झाल्याने सासरचे लोक तिचा छळ करत होते. इतकंच काय तर महिलेला घरातून काढण्याची धमकीही दिली गेली. याच जाचाला कंटाळून महिलेने असं धक्कादायक पाउल उचललं की, तिला तरूंगात जावं लागलं.

नोएडाच्या सेक्टर २४ मधील ईएसआय हॉस्पिटलमधून एक आठवड्याआधी एक नवजात बाळ चोरी झाल्याची घटना समोर आली होती. नोएडाचे डीसीपी हरीश चंद्र यांनी सांगितलं की, गुरूवारी पोलिसांनी ही केस सॉल्व केली. बाळाला ताब्यात घेऊन कुटुंबियांच्या हवाली करण्यात आलं. राणी नावाच्या महिलेला पोलिसांनी अटकही केली.

पोलिसांनी सांगितलं की, इशरत नावाच्या महिलेने एक आठवड्याआधी एका मुलाला जन्म दिला होता. तिचं हे बाळ हॉस्पिटलमधून कुणीतरी उचलून घेऊन गेलं होतं. या केसमध्ये चौकशीनंतर राणी नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली. राणीने चौकशीदरम्यान सांगितलं की, तिचं लग्न जवळपास ३ वर्षाआधी शौकतसोबत झालं होतं. लग्नानंतर तीन वर्षात तिला बाळ झालं नाही. यामुळे तिच्या सासरचे लोक वैतागलेले होते. तिला घरातून काढण्याची धमकी देत होते. त्यामुळे तिने बाळाची चोरी केली.  

पोलिसांनी सांगितलं की, लग्नानंतर महिलेचं मिसकॅरेज झालं होतं. त्यामुळे ती चिंतेत होती. तिने घरी सांगितलं की, तिला बाळ होणार आहे आणि ती ईएसआय हॉस्पिटलमध्ये भरती आहे. त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये फिरतही होती. एडीसीपीनुसार, ही केस सॉल्व करण्यासाठी 300 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरा चेक करण्यात आले. गुरूवारी राणीला तुरूंगात टाकण्यात आलं. तेच पोलिसांनी सांगितलं की, जर आरोपी महिलेने तक्रार केली तर तिच्या सासरच्या लोकांविरोधात कारवाई केली जाऊ शकते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!