Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याची रोहित पवारावर टीका

‘रोहित पवार स्वत: हडपसर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून तिकीट घेऊन निवडणूक लढवायला चालले होते, कर्जत जामखेडमधून निवडून आल्यानंतर मंत्रीपद दिलं नाही म्हणून भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांना भेटून आले आणि राजीनामा देऊन कमळ चिन्हावर निवडून येऊन यांना धडा शिकवतो, त्यामुळे रोहित पवार यांच्यावर निष्ठा हा शब्द सोबत नाही, अशी टीका अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी केली.काल बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी खासदार शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.‘सहा महिन्यापूर्वी मोहिते पाटलांनी आणि मी प्लॅन केला’ उत्तम जानकरांनी सांगितली इनसाइड स्टोरी

“पवार साहेबांनी सुद्धा निष्ठा सोडली नाही असं म्हणाले मी शरद पवार यांच्यावर बोलावं एवढा मी मोठा नाही. पण, बोलायचं म्हटलं तर एका एपिसोडमध्ये होणार नाही. काल रोहित पवार म्हणाले, सर्वजनिक जीवनात विचार महत्वाचे आहेत. कुठले विचार महत्वाचे आहेत, २०१४ साली भाजपाला पाठिंबा दिला तेव्हा कुठे गेले विचार. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला तेव्हा राष्ट्रवादीने शिवसेनेचा विचार स्विकारला की शिवसेनेने राष्ट्रवादीचे विचार स्विकारला. तेव्हा कुठे विचार गेला, त्यामुळे रोहित पवार यांनी विचारावर बोलू नये,असा टोलाही उमेश पाटील यांनी लगावला.”अजित पवार यांची गुंडाबरोबर तुलना केली जात आहे. तुम्ही कर्जत जामखेडमध्ये कसे निवडून आला, त्यावेळी कुणाची मदत घेतली हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे तुम्ही ही भाषा वापरु नका, असंही उमेश पाटील म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!