
पुणे प्रतिनिधी – पुणे शहर तसेच इतर गावे कचरामुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे.काही ठिकाणी कारवाई करून दंड देखील आकाराला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे सासवड रोडवर दिवे घाटात जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कचरा टाकून दुर्गंधी पसरवली होती, सासवड रोडवरील दिवे घाट येथील स्वच्छता करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ क्र ४ उपायुक्त प्रसाद काटकर,सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांच्या आदेशाने आरोग्य निरीक्षक सचिन लडकत, मोकादम विकास सकट यांच्या नियंत्रणाखाली हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालय यांच्या अंतर्गत पुणे सासवड रोडवरील दिवे घाट येथील स्वच्छता काम सुरु करण्यात आले आहे अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त संदीप कदम यांनी रॉयल मिडिया न्यूज शी बोलताना दिली
काही ठिकाणी कारवाई करून दंड देखील आकाराला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे सासवड रोडवर दिवे घाटात जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कचरा टाकून दुर्गंधी पसरवली होती, कचरा टाकल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे अशी तक्रार नागरिकांनी केल्या होत्या, ह्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त संदीप कदम यांनी तात्काळ आदेश देत स्वच्छता करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्यानंतर लगेचच कचरा उचलण्यास सुरवात केली, पुणे सासवड वरील दिवेघाट चकाचक झालेला पाहायला मिळाला, दिवेघाटातून एकुण ९ टन कचरा उचलला आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी बोलताना दिली.
परिमंडळ क्र ४ उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले कि हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालय यांच्या अंतर्गत पुणे सासवड रोडवरील दिवे घाट येथील स्वच्छता काम सुरु करण्यात आले आहे, पुढेही अशीच स्वच्छता केली जाईल,नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून दुर्गंधी पसरवू नये, पुणे महानगरपालिकेला सहकार्य करावे.