
दोघांमध्ये वाद झाला प्रियकराने विवाहितेचा काटा काढला
रायगड जिल्ह्यातील खून प्रकरणाचा पोलीसांनी लावला छडा
रायगड दि १ (प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यात एका नव विवाहित महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रियकरानेच एका विवाहित महिलेची हत्या करून तिचा मृददेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूनम असं मृत तरुणीचं नाव असून ती २१ ऑगस्टपासून अलिबाग येथून बेपत्ता होती. पोलिसांनी आरोपी सचिनला अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरूड तालुक्यातील धनगर वाडी-महलोर रस्त्यावर प्रियकरानेच विवाहीत महिलेची हत्या करून मृतदेह जाळला होता. पोलिसांनी महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर या घटनेचा कसून तपास केला. प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याची बाबा तपासाअंती समोर आली. आरोपी विवाहीतेवर प्रेम करत होता. पण तिचे दुसरीकडे लग्न झाल्यापासून तो दुखावला गेला होता. त्यामुळे त्याने तिचा खून करून मृतदेह जाळला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.