दारूच्या नशेतील नको ते करायला गेला जीवाला मुकला
घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, दृश्य विचलित करणारी
पिंपरी चिंचवड दि १ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेमुळे खिडकीतून पडून एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पिंपरी चिंचवड येथील निगडी परिसरात राहणाऱ्या प्रेरणा सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे.
अनिल कांबळे या व्यक्तीने घराच्या खिडकीमधून एक कापड बाहेर टाकले. या कापडाच्या सहाय्याने तो खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता. पाचव्या मजल्यावरून खाली उतरत होता. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याचा तोल जाऊन तो पाचव्या मजल्यावरून खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यावेळी तो दारूच्या नशेत होता. लोक त्याला असं न करण्याचा सल्ला देत होते. मात्र, हा व्यक्ती कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. अचानक त्याचा तोल गेला आणि पाचव्या मजल्यावरुन कोसळून त्याचा मृत्यू झाला. दारूचे व्यसन हे माणसाला मृत्यच्या दारापर्यंत घेऊन जाते हे या घटनेवरून समोर येत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दारूच्या नशेत माणसाचा कुठल्या गोष्टीला सामोरे जावे लागेल याचा प्रत्यय आज आला. या माणसाला साक्षात मृत्यूला सामोरे जावे लागले. दारूचे व्यसन हे माणसाला मृत्यच्या दारापर्यंत घेऊन जाते हे या घटनेवरून समोर येत आहे.त्यामुळे व्यसनापासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो.