Latest Marathi News
Ganesh J GIF

नवरदेवाला पाहताच नव्या नवरीने दिला सर्वांनाच धक्का

सोशल मिडीयावर व्हिडिओ जोरदार व्हायरल, नवरदेवाचे भाव पाहण्यासारखे, नवरीने पाहुण्यांसमोरच....

पुणे – सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात नेम नाही. पण सध्या लग्नसराई असल्यामुळे लग्नातील आणि खासकरून होणाऱ्या नवरा बायकोचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

लग्नामध्ये नवरीने डान्स करणे सध्याचा ट्रेंड आहे. अनेकदा तर नवरी साखरपुडा असतानाही डान्स करते. त्यामुळे नवरींचे अनेक डान्स व्हिडीओ आजवर व्हायरल झाले आहे. असाच एक नवरीचा डान्स व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नवी नवरी बेभान होऊन नाचताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून तेथे उपस्थित महिलाही थक्क झाल्या आहेत. व्हिडिओत दिसत आहे की, नवरी आपल्या नवऱ्यासाठी हा डान्स करत आहे. “मराठमोळा थोडासा साधा भोळा, लाखामंधी एक पोरगा पाहिजे गोरा गोरा” या गाण्यावर ही नवरी भर मांडवात नवरदेवासमोर डान्स करत आहे. यावेळी पाहुणे मंडळीही या नवरीला पाहतच राहिले आहेत. तर नवरदेव तर लाजून लाल झाला होता. स्टेजवर एंट्री घेत असताना नवरीने हा डान्स केला. विशेष म्हणजे याची कोणालाच कल्पना नसल्यामुळे सर्वजण काहीकाळ थक्क झाले होते. नवरदेवाच्या चेहऱ्यावरील भाव तर पाहण्यासारखे होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर nihit_healt या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. सध्या या व्हिडिओला नेटकरी वर्गातून मोठी पसंती मिळत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!