जंगलाचे विश्व खूप धोकादायक आहे. जगायचे असेल तर इतर प्राणी व प्राण्यांवर वर्चस्व गाजवावे लागेल, असा जंगलाचा नियम आहे. नाहीतर जीव गमवायला तयार राहा. सोशल मीडियावर दररोज जंगलाशी संबंधित डझनभर व्हिडीओ पाहायला मिळतात.यातील काही व्हिडीओ युजर्सला धडकी भरवणारे असतात. आज असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची रात्रीची झोपच उडेल. हा व्हिडीओ हरिण आणि अजगराचा आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका अजगराने एका हरणाला घट्ट विळखा घातला आहे. तो हरणाला जिवंत गिळण्याचा प्रयत्न करत आहे. हरणानेही ठरवले आहे की आता आपला जीव वाचवणारच नाही. आपण पाहू शकता की, अजगराने प्रथम आपल्या भक्ष्याला पकडले आहे आणि त्याला घट्ट विळखा घातलेला आहे. पुढे तो त्याला गिळणार आहे. यानंतर एक व्यक्ती अचानक हरणाला वाचवण्यासाठी काहीतरी करते. त्यानंतर अजगर घाबरतो आणि हरणाला सोडून जीव वाचवण्यासाठी तेथून पळून जातो . व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्यक्ती झाडाच्या फांदीने अजगरावर हल्ला करते. स्वत:वर हल्ला होताना पाहून अजगर घाबरला आणि हरणाला त्याच्या तावडीतून सोडून देतो. यानंतर तो तेथून पळून जातो. दुसरीकडे, हरिणाही जीवावर बेतले असे वाटते आणि कसे तरी तेथून पळून जाण्यात यशस्वी होते.
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ उघड्यावर शौचास गेलेल्या व्यक्तीशी संबंधित आहे. तो माणूस शौच करण्यापूर्वीच अजगराने त्याच्यावर मागून हल्ला केला. सुमारे 13 फूट लांबीच्या अजगराने त्याला त्याच्या शरीरासह पूर्णपणे पकडले. अजगराने त्या व्यक्तीला जिवंत गिळण्याचा प्रयत्न केला यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण अजगराने त्याला आपली शिकार बनवण्याआधीच तो माणूस ओरडू लागला. त्याचा आरडाओरडा ऐकून लोक धावत आले आणि ते दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला. यामध्ये अजगराने त्या व्यक्तीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते. अजगराच्या मजबूत पकडीमुळे त्या व्यक्तीला एक इंचही हालचाल करता येत नव्हती.