
आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक जाहीर
या दिवशी भिडणार भारत पाकिस्तान, या ठिकाणी होणार सामना
मुंबई – आगामी वर्षात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही १९ फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून ९ मार्च रोजी त्याचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तानात होणार असली तरीही टीम इंडिया स्पर्धेतील आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक आयसीसीकडून जाहीर करण्यात आले आहे.या स्पर्धेचं यजमानपद हे पाकिस्ताकडे आहे. पण भारत आणि पाकिस्तानचे सामने हे यूएईमधील दुबई शहरात आयोजित करण्यात येणार आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. हा सामनाही दुबईत होणार आहे. दुबई येथे २३ फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होणार आहेत. तसेच या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार असून आयसीसीने प्रत्येकी चारच्या दोन गटात संघाची विभागणी केली आहे.
वेळापत्रक
१९ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
२० फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
२१ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
२२ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२३ फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
२४ फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
२५ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
२६ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२७ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
२८ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर
१ मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची
२ मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
४ मार्च – उपांत्य फेरी 1, -दुबई
५ मार्च – उपांत्य फेरी 2, – लाहोर
८ मार्च – अंतिम – लाहोर/दुबई