Latest Marathi News
Ganesh J GIF

बर्निंग बसचा थरार ! पुणे-सोलापूर महामार्गावर धावत्या बसने घेतला पेट ; प्रवासी सुखरूप, व्हिडीओ व्हायरल

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – पुण्यात बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलच्या समोर धावत्या बसने पेट घेतला. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत बसचे मोठे नुकसान झाले आहे. सदरची घटना सकाळी नऊ वाजताच्या आसपास घडली आहे. या बसमध्ये एकूण १७ प्रवासी प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार. ही बस हैदराबाद वरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी या बसमध्ये एकूण १७ प्रवासी प्रवास करत होते. ही बस कदमवाकवस्ती येथे आली असता गाडीचे टायर फुटले आणि गाडीने अचानक पेट घेतला. आगीत बसचे संपूर्ण नुकसान झाले आहे.

 

सदर घटनेची माहिती मिळताच लोणी-काळभोर पोलीस आणि पुणे महानगर पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून यावेळी महामार्ग दोन्ही बाजुंनी बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत बसचे मोठे नुकसान झाले आहे

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!