
इराण दि २४ (प्रतिनिधी) – एका महिलेने पतीवर चाकूने वार करून त्याचा खून केला. यानंतर तिने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते शिजवले. हा धक्कादायक प्रकार इराणमध्ये घडला आहे. महिलेला तिच्या घरातून पतीच्या शरीराचे तुकडे सापडल्यानंतर अटक केली.
आरोपी महिलेच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली होती. या नंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. यावेळी पोलीसांना तिच्या पतीचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी तीला अटक केली आहे. आरोपी महिलेच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध होते. त्यामुळे तो तिला आणि मुलीला मारहाण करत असे. तिने तिच्या पतीच्या गर्लफ्रेंडला त्यांच्या घरी पाहिले होते. पतीची प्रेयसी निघून गेल्यानंतर दोघा पती-पत्नीमध्ये जोरदार वादावादी झाली. या दरम्यान रागाच्या भरात पतीने चाकू आणला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली व त्यात महिलेले पतीच्या पोटात चाकू खुपसून हत्या केली.
या महिलेचे वयाच्या 15 व्या वर्षी जबरदस्तीने लग्न लावण्यात आले होते.पण पतीकडून होत असलेली सततची मारहाण, शिव्या आणि अवैध संबंध अशा वागण्याला ही महिला कंटाळली होती.त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले.