Just another WordPress site

डान्स बार फोडणा-या एकनाथ शिंदेच्या घराशेजारी डान्सबार सुरू

अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र,सत्ताधारीही आवक

मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- ठाण्यातील डान्स बार बंद करणारा मी कार्यकर्ता आहे, असे म्हणणाऱ्या शिंदे यांच्या ठाण्यातील घराजवळचा आता डान्स बार सुरू असल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. तसेच राज्यात गेल्या काही दिवसांत कायदा व सुव्यवस्थाबाबत झालेल्या घटनांवर त्यांनी भाष्य करत सरकारवर टिका केली. अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करताना अजित पवार अनेक मुद्द्यांवर आक्रमक झालेले पहायला मिळाले.

GIF Advt

सभागृहात अजित पवार म्हणाले की, एकीकडे 16 डान्स बार फोडणारा हा एकनाथ शिंदे आहे, असे आपण सांगितले. मात्र ठाण्यात तुमच्याच घराशेजारी डान्स बार सुरू आहेत. डान्सबार आपण बंद करावेत. ऑनलाईन मटका ही सध्या जोरात सुरू आहे. आम्ही सत्तेवर असतानाही विरोधीपक्ष विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. मात्र, आम्ही त्यांना कधी अडवलेले नाही. परंतु आज जाणीवपूर्वक हा प्रकार घडला. महाराष्ट्रात ज्याप्रकारे आमच्या घोषणा दाखवल्या गेल्या, त्याने आपली प्रतिमा मलिन झाल्याची शंका त्यांना आली असावी, चारोच्या मनात चांदणं असा हा प्रकार असल्याचे अजित पवार म्हणाले.त्याचबरोबर मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्यामुळे पवारांनी शिंदे सरकारवर निशाना साधला आहे.

भंडारा जिल्ह्यात घडलेल्या बलात्कार प्रकरणावर पवार म्हणाले की, भंडारा बलात्कार घटना दुर्दैवी आहे. पोलिसांनी वेळीच पिडीतेला रूग्णालयात दाखल केले असतं तऱ ही वेळ आलीच नसती,असे म्हणत अजित पवारांनी सरकारच्या अनास्थेवर नाराजी व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!