….म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
पतीच्या खिशात शक्तीवर्धक गोळ्या ठेवत केला बनाव, खरे कारण समोर आल्यानंतर पोलिसही चकित
कानपूर – कानपूरमध्ये पत्नीने पतीची हत्या करत त्याच्या खिशात शक्तीवर्धक कॅप्सूल ठेवत औषधाच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचा केलेला बनाव उघडकीस आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर या सर्व गोष्टीचा खुलासा झाला आहे. त्यामुळे पोलिसही चकित झाले होते.
ओरैयातील दिबियापूर इथे आबिद अली पत्नीसोबत ध्रुवनगरमध्ये राहत होता. त्यांना एक मुलगासुद्धा आहे. शनिवारी आबिद यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. आबिद च्या खिशात शक्तिवर्धक कॅप्सूलचे रॅपर मिळाले. शरीरावर कुठलीही जखम नव्हती. आबिदची पत्नी शबानाने पतीने शक्तीवर्धक गोळ्याचा ओव्हरडोस घेतल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनाही तसेच वाटले. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबियांनी दफनविधी केला. मात्र दुसऱ्या दिवशी पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर शबानाची पोलखोल झाली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे ओव्हरडोसची कथा रचण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला तेव्हा शबानाचा भाऊ सलीमने पोलिसांना सांगितलं की आबिदची हत्या झालेली असू सकते. तसंच या हत्येत शबानाला कुणीतरी साथ दिली असावी. त्यानंतर पोलिसांनी शबानाला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी सुरु केली. तिचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यावेळी पोलिसांना कळलं की रेहान बरोबर तिचे प्रेमसंबंध होते. यानंतर रेहानलाही ताब्यात घेतलं. दोघांची कसून चौकशी झाली तेव्हा या दोघांनीही त्यांच्या प्रेमसंबंधात आबिद अडथळा ठरत असल्यामुळे त्याला ठार केल्याची कबुली त्यांनी दिली. गुन्ह्याच्या रात्री आबिद झोपल्यानंतर शबानाने रेहान आणि त्याचा मित्र विकासला घरी बोलावले. त्यानंतर तिघांनी गळा दाबून आबिदची हत्या केली. हत्येचा संशय येऊ नये म्हणून शक्तीवर्धक कॅप्सूलच्या सेवनाच्या ओव्हरडोसने मृत्यू झाल्याच दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये प्रकरणाची सत्यता समोर आली.
शबाना आणि रेहान यांच्यात मागच्या वर्षभरापासून सोशल मीडियावर मैत्री झाली होती. आबिद घरी नसताना तो शबानाला भेटायला येत असे. या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. ज्याबाबत आबिदलाही संशय आला. त्यानंतर आबिद आणि शबाना यांच्यात वाद सुरु झाले. या वादांना कंटाळून शबाना आणि रेहान यांनी आबिदला आपल्या मार्गातून हटवण्याचा कट रचला. पण पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.