
तुमचे एचडीएफसी बँकेत अकाउंट आहे का? मग ही बातमी वाचा
बँकेने केली मोठी घोषणा, ग्राहकांना या सेवांचा मिळणार नाही लाभ, कारण काय?
मुंबई – एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. २४ आणि २५ जानेवारी २०२५ रोजी बँकेच्या काही डिजिटल आणि बँकिंग सेवा तात्पुरत्या बंद राहणार आहेत. सेवेत सुधारणा करण्यासाठी ही देखभाल प्रक्रिया केली जात आहे, त्यामुळे काही काळ या सेवा उपलब्ध होणार नाहीत.
बँकेची सेवा २४ आणि २५ जानेवारीला बंद राहणार आहे. काही मेंटनेंसच्या कामांसाठी बँकेची सेवा बंद राहणार आहे. २४ जानेवारीला रात्री १० वाजल्यापासून ते २५ जानेवारीला दुपारी २ वाजेपर्यंत सर्व्हिस बंद राहणार आहे. १६ तास तुम्हाला चॅटबँकिंग, एसएमएस बँकिंग, फोनबँकिंग ही सेवा मिळणार नाही. तर २५ जानेवारीला एचडीएफसी बँकेची यूपीआय सेवा रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करु शकणार नाहीत. बँक आपल्या डिजिटल सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. ही देखभाल प्रक्रिया ग्राहकांना अधिक चांगल्या आणि वेगवान सेवा देण्यासाठी उपयुक्त ठरेल. तरी, २४ आणि २५ जानेवारी या दोन दिवसांत डिजिटल सेवा बंद राहणार असल्याने ग्राहकांनी आपल्या व्यवहारांबाबत योग्य नियोजन करावे, असे आवाहन बँकेने केले आहे.
एचडीएफसी बँकेने याआधीही १७ आणि १८ जानेवारीला बँकेच्या काही सर्व्हिस बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे एचडीएफसीच्या ग्राहकांनी सोबत रोख रक्कम ठेवावी, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.