Latest Marathi News
Ganesh J GIF

भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ अष्टपैलू खेळाडूची पत्नी होणार मंत्री

निवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल, अनेक मंत्र्याना डच्चू, क्रिकेटपटूच्या पत्नीला मिळणार महत्वाची जबाबदारी

गांधीनगर – गुजरातच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठा बदल पाहायला मिळू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळात उद्या किंवा परवा मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. यात क्रिकेतपटूच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

गुजरातच्या मंत्रिमंडळात येत्या दोन दिवसांत मोठा फेरबदल होणार आहे. मंत्रिमंडळात नवीन चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पावले उचचली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात रिवाबा जडेजा, जीते वाघानी आणि अर्जुन मोडवाडिया मंत्री होण्याची शक्यता आहे. हर्ष सांघवी यांना कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर गुजरात मंत्रिमंडळात हा पहिलाच मोठा फेरबदल असणार आहे. या बदलात रिवाबा जडेजा, अर्जुन मोडवाडिया, जितू वाघाणी आणि हर्ष सांघवी यांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश होऊ शकतो. हर्ष सांघवी यांना कॅबिनेट मंत्रीपदावर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते, या फेरबदलात ८ ते १० मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो. रिवाबा महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विषयांवर त्यांच्या थेट आणि स्पष्ट भूमिकेसाठी ओळखल्या जातात. त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास भाजप महिला मतदार आणि तरुण वर्गात संदेश देण्याचा प्रयत्न करेल, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. राज्य सरकारचा हा फेरबदल २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना लक्षात घेऊन करण्यात येणार असल्याचे समजते. सध्या गुजरातच्या मंत्रिमंडळात १७ मंत्री आहेत. नियमानुसार, जास्तीत जास्त २७ मंत्री असू शकतात. १० मंत्रीपदे रिक्त असून, याच ठिकाणी नव्या चेहऱ्यांना स्थान मिळेल, अशी चर्चा आहे. दरम्यान, या फेरबदलामुळे राज्यात अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

रिवाबा जडेजा या क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी आणि राजकीय नेत्या आहेत. रिवाबा जडेजा या २०२२ साली भाजपच्या तिकीटावर उत्तर जामकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघात त्यांनी ५० हजार मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!