Latest Marathi News
Ganesh J GIF

“यशवंत”ला संपुष्ठात आणणारी मंडळी सत्तेसाठी पुन्हा एकत्र – पॅनल प्रमुख प्रकाश जगताप

शेतकरी सभासद विरोधकांना माफ करणार नाहीत - पॅनल प्रमुख प्रकाश जगताप

अण्णासाहेब मगर यांनी एका उदात्त हेतूने पूर्वे हवेलीच्या माळरानावर तालुक्याच्या विकासासाठी एक अदभूत अन् शाश्वत विकासाचे स्वप्न पाहिलं परंतु विचारांचा वारसा नसताना फक्त पांढरी कपडे घालून मिरवणाऱ्या या लोकांनी अगोदर सिटिझन बँकेचे वाटोळे केलं, जाऊ तिथे खाऊ या उक्तीप्रमाणे हवेली तालुका खरेदी विक्री संघास स्व.अण्णासाहेब मगर यांनी पुणे बाजार समितीच्या आवारात ३ गुंठ्याचे ४ प्लॉट दिले होते तेही खाजगी बांधकाम व्यावसायिकाला विकण्याचे महापाप करून तालुक्यावर अन्याय केला असा घणघणाती आरोप अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनल प्रमुख प्रकाश जगताप यांनी केला आहे. लोणी काळभोर भागातील सभासदांच्या गाठीभेटी घेत असताना माध्यमांशी बोलत होते.
           यशवंतच्या दिवाळखोरीला खरेतर विरोधकच कारणीभूत असून 1 इंचही जागा न विकता यशवंत सुरु करू अशा थापा मारून सभासदांची दिशाभूल करत आहेत. परंतु पांडुरंग आप्पा काळे साखर कारखाना वाचवत असताना या मंडळींनी साधी लोकवर्गणी ही न देता हास्यास्पद वक्तव्य करत खिल्ली उडवण्याचे काम केलं. विरोधक मंडळी म्हणजे प्रलोभानाचा होलसेल बाजार असून त्यांना हवेली तालुक्याच्या अस्मिता असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची उर्वरित जमीनही बांधकाम व्यावसायिकांना द्यायची भूमिका आहे. हे कारखान्याची १ इंच ही जमीन शिल्लक ठेवणार नाहीत करोडोच्या वल्गना करायच्या आणि सभासदांच्या लोकवर्गणीतून सुरू झालेल्या या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरती डोळा ठेवायचा ही यांची जावो तिथे खाऊ हीच भूमिका आहे. यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे असा आरोप यावेळी प्रकाश जगताप यांनी केला. सभासदांना कदाचित माहीत नसेल परंतु या समोरील पॅनल प्रमुख प्रकाश म्हस्के यांनी या अगोदरच सिटीजन सहकारी बँक अध्यक्ष असताना सभासदांच्या ठेवी बुडवण्याचा भीम पराक्रम केला असून चोराला मोर साक्ष या व्यक्तीप्रमाणे अन् गुरु तसा चेला ही भूमिका घेत माधव काळभोर आणि प्रकाश म्हस्के या जोडगोळीने अध्यक्ष असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये हवेली तालुका खरेदी विक्री संघासाठी अण्णासाहेब मगर यांनी दिलेली बारा गुंठे शासकीय जागा संस्थेच्या फायद्यासाठी न वापरता आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी याचा वापर कर करण्याचा कारभार यांनी केला आहे आणि आता हीच टोळी आपल्या तालुक्याचे अस्मिता असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मुक्याच्या जागेवरती नजर ठेवून आहे.
            यशवंत सहकारी साखर कारखाना कुठे पूर्ववत सुरू होण्यासाठी पांडुरंगआप्पा काळे यांनी केलेलं काम सर्व सभासदांना माहित आहेच. आज त्यांच्याच घरातील तरूण मोरेश्वर काळे हा कारखाना वाचवण्यासाठी घरोघरी फिरत आहे.आज ही तरुणपिढी आणि प्रशांत काळभोर, बाळासाहेब चौधरी यांच्यासह आम्ही हा यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा संकल्प केला असून सभासदांच्या मनातील इच्छा पूर्ण करणे हीच आमची भूमिका आहे. पूर्व हवेली तालुक्याची अस्मिता आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आर्थिक गणित जुळवण्यासाठी हा कारखाना पुन्हा सुरू होणं ही काळाची गरज आहे याची जाण अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलला आहे तरी सर्व सभासदांनी या पॅनलच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी कपबशी या चिन्हावर शिक्का मारून मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!