‘तर गाठ माझ्याशी आहे परत सांगितलं नाही म्हणाल’
महाराजांवरील या दोन चित्रपटांवर राजे संतापले, थेट दमच भरला
पुणे दि ६(प्रतिनिधी)- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित हर हर महादेव चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्यामुळे संभाजीराजे संतप्त झाले आहेत. यावेळी त्यांनी चित्रपट निर्मात्यांना सज्जड इशारा दिला आहे.राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेमकी उलट भुमिका संभाजीराजेंनी घेतली आहे.
संभाजी राजेंनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही खपवून घेणार नाही. शिवरायांचा चुकीचा इतिहास लोकांसमोर आणू नये. इतिहासाचा गाभा सोडून काहीही दाखवू नका, इतिहासाचा विपर्यास करु नका. कलाकार मंडळींनी हे गांभीर्याने घ्या. असे चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे परत सांगितलं नाही म्हणाल’ अशा शब्दात त्यांनी चित्रपट निर्मात्यांना दम भरला. हर हर महादेव चित्रपटातील दृश्य आणि आशयावर तर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील मावळ्यांच्या वेशभूषेवर संभाजीराजेंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी असे चित्रपट न पाहण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे.
हर हर महादेव या चित्रपटाला खुद्द राज ठाकरेंनी आवाज दिला होता तर वेडात मराठी वीर दाैडले सार या चित्रपटाच्या मुहूर्ताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी या चित्रपट निर्मितीबद्दल काैतुकही केले होते. पण आता संभाजी राजेंनी आक्रमक भुमिका घेत नाराजी व्यक्त केल्यामुळे निर्माते काय भूमिका घेतात हे पहावे लागेल.